कामाची अंमलबजावणी

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निकश्चत करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार / नांव)कामाचे स्वरुप : सामान्य प्रशासन विभागामध्ये महानगरपालिकेकडे येणारे सर्व टपाल, शासकीय पत्रव्यवहार व त्यामध्ये दिलेले आदेश व सुचना याबाबत संबंधीत खात्याला कळविणे व त्याप्रमाणे कार्यवाही करुन घेणे. तसेच महापालिका महासभा, मा.स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समिती तसेच इतर सबकमिटया असल्यास त्यांच्या सभा नियमातील तरतुदीनुसार वेळोवेळी घेणे, त्याचे कार्यवृत्तांत लिहून संबंधीत खात्यांना कळविणे, ते अंमलबजावणीबाबत आढावा घेणे इत्यादी.

संबंधित तरतुद : अधिनियमातील तरतुदीनुसार.
अधिनियमाचे नांव : मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९.
नियम : उपविधी मंजुर केल्याप्रमाणे.
शासन निर्णय :
परिपत्रके :
कार्यालयीन आदेश :

अनु.क्रकामाचे स्वरुपकालावधी दिवसकामासाठी जबाबदार अधिकारीअभिप्राय
मा.महासभा मिटींग घेणेदरमहा ठरावीक तारखेला सक्तीने महिन्यातून एकदानगरसचिव 
मा.स्थायी समिती सभादर आठवडयातून एकदा–//– 
मा.महिला व बालकल्याण समिती सभासभापतींच्या आदेशानुसार–//– 

कार्यालयीन प्रकरण सादर करण्यांची पध्दत –

अ.नं.कामाचे स्वरूपकालावधीचा दिवसकामासाठी जबाबदार अधिकारीअभिप्राय
नगरपालिका सभागृह मिळणेबाबत.३दिवसकार्यालयीन अधिक्षक – सामान्य प्रशासन विभाग
लोकसंख्या दाखला३दिवसकार्यालयीन अधिक्षक – सामान्य प्रशासन विभाग
मालमत्तावर नाव लावणे२१ दिवसरिव्हीजन विभाग प्रमुख
ओपन प्लॉटवर कर आकारणी करणेबाबत.६४ दिवसरिव्हीजन विभाग प्रमुख
अन्न व परवाना३१ दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी
जन्म दाखला३ दिवसरेकॉर्ड किपर
मृत्यु दाखला३ दिवसरेकॉर्ड किपर
रिव्हीजन उतारे / डिमांड रजिस्टर उतारे याबाबतच्या नकला.२१ दिवसरेकॉर्ड किपर
स्थायी समिती / जनरल बोर्ड / बांधकाम परवानगी ठराव यांच्या नकला१० दिवसरेकॉर्ड किपर
१०जन्म नोंद नसलेबाबतचा दाखला१५ दिवसरेकॉर्ड किपर
११मृत्यु नोंद नसलेबाबतचा दाखला१५ दिवसरेकॉर्ड किपर
१२सामान भाडया संबंधी अर्ज५ दिवसनगररचनाकार
१३मांडव भाडया संबंधी अर्ज५ दिवसनगररचनाकार
१४मंजुर विकास योजना आराखडा, दुसरी सुधारीत प्रसिध्द केलेल्या विकास योजनामध्ये भाग नकाशा बाबतचा अर्ज.१५ दिवसनगररचनाकार
१५झोन दाखला१५ दिवसनगररचनाकार
१६ज्या प्रकरणास मंजुरी मिळाली आहे/बांधकाम/रेखांकन/उपविभागीय / एकत्रीरीकरण प्रारंभ प्रमाणपत्र च्या सत्य प्रति मिळणेसाठी अर्ज१५ दिवसनगररचनाकार
१७बी फॉर्मची सत्यप्रत्र मिळणे संबंधीचा अर्ज.१५ दिवसनगररचनाकार
१८ना – देय प्रमाणपत्र.१५ दिवसनगररचनाकार
१९झाडे काढणे / तोडणे संबंधी अर्ज४५ दिवसगार्डन प्रमुख
२०निवासी कारणासाठी बिगर शेती कामी ना – हरकत दाखला अर्ज३० दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी
२१लॉजींगचा व्यवसाय करणेबाबत ना – हरकत दाखला अर्ज.२१ दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी
२२आरोग्य परवाना मिळणेबाबतचा अर्ज ( महानगरपालिका नियम खालील उपविधी अंतर्गत येणारे परवाने)२१ दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी
२३सिनेमागृह / व्हिडीओहॉलसाठी ना – हरकत दाखला अर्ज.३० दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी
२४इतर कारणांसाठी ना – हरकत दाखला अर्ज.३० दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी
२५पाण्याचे नविन नळ कनेक्शन मागणे अर्ज.६४ दिवसशहर अभियंता
२६नळ दुरूस्ती अर्ज२० दिवसशहर अभियंता
२७मालमत्ता कराबाबतचे स्वतंत्र बिल मिळणेबाबतचा अर्ज.२१ दिवसवसुली अधिक्षक
२८फ्रि सेल रॉकेल विक्री ना – हरकत दाखला.२५ दिवसफायर फायटर अधिक्षक
२९आग विझविल्याबाबतचा दाखला२१ दिवसफायर फायटर अधिक्षक
३०फायर फायटर ना – हरकत प्रमाणपत्र.२१ दिवसफायर फायटर अधिक्षक
३१महानगरपालिका मंगलकार्यालय मिळणेबाबत अर्ज.४ दिवसशहर अभियंता
३२मंगल कार्यालय डिपॉझीट रिफंड मिळणेबाबत अर्ज.२१ दिवसशहर अभियंता
३३माहितीचा अधिकाराबाबतचा अर्ज.अर्ज विक्री